![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ नोव्हेंबर । सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचाही परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच लग्नसराईमध्ये सोन्याला मागणी असल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असते.
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये व्यवहार सुरू होताच सोन्याच्या किंमतींमध्ये कालपेक्षा घसरण दिसून आली. दुपारी 1 वाजेपर्यंत पुन्हा सोन्याचे भाव सावरताना दिसत आहे. दुपारी MCXवर सोन्याचे भाव 47848 रुपये प्रति तोळे (+550) इतके होते. तर चांदीचे भाव 62750 रुपये प्रति किलो इतके होते.सोन्याच्या किमतीत सध्या विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.
त्यामुळे ऑगस्ट 2020 च्या सोन्याच्या दरांच्या तुलनेत आजही सोने 7 ते 8 हजाराने स्वस्त मिळत आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सोने – चांदीत गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.