महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ नोव्हेंबर । Airtel आणि Vodafone Idea, भारतातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला प्रीपेड प्लॅनच्या त्यांच्या दरात वाढ केली. आता कंपन्यांना जुन्या प्लॅन साठी रिचार्ज करणाऱ्यांसाठी देखील दोन्ही कंपन्यांनी नवीन किमती आता लागू केल्या आहेत आणि आता कोणीही त्यांच्या नंबरवर रिचार्ज करत असतील तर त्यांना नवीन वाढलेली किंमत भारावी लागणार आहे.
आज आपण तुम्हाला तुमच्या Airtel आणि Vodafone प्रीपेड प्लॅन्सवर किती पैसे खर्च करावे लागतील ते पाहाणार आहोत. Airtel आणि Vodafone Idea या दोन्हींवर 79 रुपये किमतीच्या बेस व्हॉईस प्लॅनची किंमत आता 99 रुपये आहे आहे. यात 50 टक्के अधिक मिनिटे व्हॉइस कॉलिंग तसेच 200MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता देण्यात येते.
Airtel आणि Vodafone Idea च्या 149 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 179 रुपये असेल. तर दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमीटेड व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 2GB डेटा मिळेल. तसेच हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे.
Airtel आणि Vodafone Idea च्या 219 प्लॅनची किंमत आता अनुक्रमे 265 आणि 269 रुपये झाली आहे, जे 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 1GB डेटा प्रतिदिन ऑफर करतात. तर 249 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता Airtel आणि Vodafone Idea या दोन्हीसाठी 299 रुपये आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटासह अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते.
Airtel वर 298 आणि Vodafone Idea वरील 299 रुपयात मिळणाऱ्या प्लॅनची किंमत आता 359 झाली असून आता 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटासह अमर्यादित कॉलिंग ऑफर केला जातो.