महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । व्होडाफोन आणि एअरटेलपाठोपाठ आता रिलायन्स जिओही महागला आहे. जिओने आपल्या प्रिपेड प्लॅन्सचे दर 21 टक्क्यांनी वाढवले असून ते पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत. जिओचे नवे दर जियो फोन प्लॅन, अनलिमिटेड प्लॅन्स, डेटा अॅड ऑन आणि रेंज आदींसाठी 19.6 टक्के ते 21.3 टक्क्यांच्या दरम्यान वाढणार आहेत. आपल्या अनलिमिटेड प्लॅन्सचीही घोषणा आज जिओने केली. जगामध्ये सर्वात कमी दरात उत्तम दर्जाची सेवा पुरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि जिओच्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देत राहू असे जिओने म्हटले आहे. 1 डिसेंबर 2021 पासून नवे अनलिमिटेड प्लॅन्स सुरू होणार आहेत असेही जिओने म्हटले आहे. व्होडाफोन आणि एअरटेलने गेल्याच आठवडय़ात आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या दरांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी आर्थिक बळकटीसाठी दरवाढ केल्याचे म्हटले होते.