महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारामध्ये प्रति तोळ्यामागे सोन्याचा भाव 242 रुपयांनी वाढला (Gold Price Today) आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार 242 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी शुक्रवारीही सोन्याचा भावात वाढ दिसून आली होती.
सोन्यासह चांदीतही तेजी पाहायला मिळाली. चांदीचा दर प्रति किलोमागे 543 रुपयांनी (Silver Price Today) वाढला. एक किलो चांदीचा भाव आता 62 हजार 248 रुपये झाला आहे. शुक्रवारी हाच दर 61 हजार 705 रुपये एवढा होता.