महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ डिसेंबर । राज्यभरातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू (Primary School reopen) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. मात्र त्यानंतर कोरोना व्हायरसचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट आल्यानं मुंबई (Mumbai), पुणे (Pune) शाळा (School) बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला. 15 डिसेंबरपर्यंत मुंबई आणि पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेनं दिली. त्यावर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जातं असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. येथून पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण सुरु व्हावं अशी आमची अपेक्षा असल्याचं मतही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. मुंबई पालिकेनं ही माहिती दिली आहे.
15 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे मनपाने दिली. (Pune Municipal Corporation declared primary school closed till 15 December) पहिली ते आठवीच्या शाळा आता 15 डिसेंबपरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मनपाने घेतला. तर 15 डिसेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं पुणे मनपाने सांगितलं आहे.