Gold, Silver Price Today ; सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ डिसेंबर । आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर चांदीच्या दरात 0.27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नव्या दरानुसार सोन्याच्या भावात 95 रुपयांची वाढ झाली असून, सोने आता प्रति तोळा 48,000 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 127 रुपयांची वाढ झाली असून, चांदी 61,683 रुपयांवर पोहोचली आहे. मौल्यवान धातुंच्या किमतीमध्ये सातत्याने अस्थिरता जाणवत आहे. दर कमी – जास्त होत असल्याने गुंतवणुकदार देखील संभ्रमात पडले आहेत.

‘आयआयएफएल’ सेक्युरेटीज कमोडिटी आणि करन्सीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सध्याच्या काळात सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे. सोबतच सध्या जगावर ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनच्या इफेक्टमुळे देखील सोने वधारले आहे. पुढील काळामध्ये सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. एप्रिल 2022 पर्यंत सोने 52,000 हजारांच्या आसपास जाऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे सातत्याने बदलत आहेत. सोन्याचे दर कमी जास्त होत असल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सोने प्रति ग्रॅम 56 हजारांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दराला घसरण लागली, या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात सोने 45 हजारांच्या देखील खाली आले होते. मात्र आता पुन्हा एकदा हळूहळू सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र सोन्याचे दर अस्थिर असल्याने अनेक गुंतवणुकदार सोन्यामधील आपली गुंतवणुक काढून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *