महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .10 डिसेंबर । तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात शहिद झालेले भारताचे CDS जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या क्रितीका आणि तारिणी या दोन्ही मुलींना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी वडिल CDS बिपीन रावत आणि आई मधुलिका रावत यांना अखेरचा निरोप देताना मुली कृतिका आणि तारिणी यांच्या डोळ्यात अश्रु तरळले होते.हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी शहिद झाल्यामुळं सध्या देशभरात दुखाचं वातावरण आहे. दिल्लीतील पालम विमानतळावर बिपीन रावत यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
CDS बिपिन रावत यांना कृतिका आणि तारिणी या दोन मुली आहेत. मोठी मुलगी कृतिकाचं लग्नं काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालं होतं तर तारिणीचं अजून शिक्षण सुरू आहे. परंतु आता हेलिकॉप्टर अपघातामुळं त्यांच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे.यावेळी रावत कुटुंबियांनी जड अंतकरणानं शोकाकुल वातावरणात बिपीन रावत यांना अखेरचा दिला. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसह सैन्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालम विमानतळावर उपस्थित राहुन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली होती. त्यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे ओलावले होते.शहीद जनरल बिपीन रावत हे एका कार्यक्रमासाठी सैन्याच्या हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामानामुळं त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यात त्यांचं निधन झालं आहे. शहीद जनरल रावत यांचं कुटुंब हे नेहमी देशसेवेत अग्रेसर राहिलेलं आहे. त्यांचे वडिल लक्ष्मण सिंह रावत हे भारतीय लष्करात सेवेत होते. ते लेफ्टनंट जनरल देखील राहिलेले आहेत.