WhatsApp ची मोठी घोषणा; आता युजरला क्रिप्टोकरन्सीमध्येही करता येणार व्यवहार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .10 डिसेंबर । मेसेजेसची देवाण-घेवणा करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फक्त मेसेजच नाही तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोदेखील (Photos) अगदी सहजपणे पाठवता येतात. आपल्या युजर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. काही महिन्यांपूर्वी कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या सहाय्याने पैसे पाठवण्याचं फीचरही सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटच्याबाबतीत (WhatsApp Payment) कंपनीनं आता एक मोठी घोषणा केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला (WhatsApp Users) त्या त्या देशांच्या चलनांसोबतच आता क्रिप्टोकरन्सीदेखील ट्रान्सफर (Transfer cryptocurrency using WhatsApp) करता येणार आहे. सध्या फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी हे फीचर देण्यात आलं आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

9to5mac.com च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कासरील (Stephane Kasriel) यांनी एकत्रितपणे याबाबत घोषणा केली आहे. नोवी (Novi) हे मेटाचं (Meta) डिजिटल वॉलेटदेखील आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं हे फीचर सध्या मर्यादित लोकांना उपलब्ध करून दिलं आहे. ज्या लोकांपर्यंत हे फीचर पोहोचलं आहे ते आता मेसेंजर अ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पाठवू आणि स्वीकारू शकतील.

हे नवीन फीचर पैसे पाठवण्याचा आणि स्वीकारण्याचा एक नवीन मार्ग आहे. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. विशेष म्हणजे यामुळे वापरकर्त्याला ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट न सोडता’ पैसे ट्रान्सफर करता येतात, अशी माहिती नोवीच्या (Novi) वेब पेजवर देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मेटा (Meta) असं नामकरण झालेल्या फेसबुक कंपनीनं, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट करण्याच्या योजनेबद्दल यापूर्वीही माहिती उघड केली होती. 2018 च्या एका अहवालात ब्लूमबर्गनं सांगितलं होतं की, कंपनी ‘स्टेबलकॉइन’ (stablecoin) डेव्हलप करण्याचं काम करत आहे. काही तज्ज्ञ लोकांनीही याला दुजोरा दिलेला आहे. स्टेबलकॉइन हे एक प्रकारचं डिजिटल चलन (Digital Currency) आहे, जे यूएस डॉलरशी संबधित असेल आणि त्याची व्हॉलेटिलीटी (volatility) खूपच कमी असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *