कोरोना व्हायरस: पुण्यातल्या बहुतांश कंपन्यांनी निवडला वर्क फ्रॉम होमचा पर्याय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- पुणे : कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात होत असल्यामुळे याला आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी कंपन्यांनीही कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पण यामुळे कामाच्या उत्पादकेतवर परिणाम जाणवू शकतो असा देखील सूर उमटत आहे.

गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, हिताची, अपल, अॅमेझॉन, शेवरॉन, सेल्सफोर्स किंवा स्पॉटीफाय यांसारख्या काही कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *