Income Tax Return: ITR शी आधार कार्ड लिंक करणं अगदी सोपं, पहा काय आहे प्रक्रिया ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. आज भारतातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी याचा वापर केला जात आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. आधार कार्ड हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. ते UIDAI संस्थेने जारी केलं आहे. हल्ली पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, जर तुम्ही करदाते असाल, तर तुम्ही तुमची ITR आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. ते आता अनिवार्य करण्यात आलं आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड ITR शी लिंक न केल्यास, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न पूर्ण करू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार ITR शी सहजपणे लिंक करू शकता. जाणून घेऊया….

आयटीआरशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
येथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल.
तुमच्या स्क्रीनवर मुख्यपृष्ठ उघडेल. येथे Profile Settings चा पर्याय निवडा.
आता तुम्हाला आधारचा पर्याय निवडावा लागेल.
नवीन पृष्ठावर तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा. त्यानंतर आता लिंकचा पर्याय निवडा.
या प्रक्रियेनंतर, पुढील चरणावर तुम्हाला तुमचा आधार तपशील पॅन डेटासह पडताळून घ्यावा लागेल.
आता तुम्हाला आयकर पडताळण्यासाठी ‘जर तुम्हाला तुमचा रिटर्न ई-व्हेरिफाय करण्यासाठी आधार ओटीपी जनरेट करायचा असेल तर’ हा पर्याय निवडावा लागेल.
काही वेळाने तुमच्या आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
तुम्ही या OTP द्वारे अपलोड केलेले रिटर्न ई-व्हेरिफाय करू शकता.
सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे आधार कार्ड यशस्वीरित्या ITR शी लिंक केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *