महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ डिसेंबर । ओबीसींवर आरक्षण च्या बाबतीत सतत अन्याय होत असतांना ओबीसी नेते व ओबीसींचे हितचिंतक जो काही प्रयत्न करित आहेत तो कमी पडत आहे…. एक हत्यार म्हणून ओबीसी नेते स्वतःचा पक्ष काढण्याचे हत्यार का वापरत नाही? ….. का तो पक्ष चालवण्याची धमक ओबीसीं मध्ये नेत्यांमध्ये नाही…..पक्ष काढल्यावर सर्व समावेशक नेतृत्वाची जी जबाबदारी लागते इतरांनाही बरोबर घेवून काम करावे लागेल ती जबाबदारी पार पाडण्याचे ज्ञान पुरेसे नाही की काय ? अशी शंका येतेय , कारण पक्षातून बाहेर पडुन स्वताची ताकद दाखवायची हिच तर संधी आहे ओबीसीं ना!…… अमूक ह्यांचा पक्ष , तमुक त्यांचा पक्ष म्हणायची वेळ पण येणार नाही…… आपल्याला आपली भूमिका मांडून आपला ह्क्क मिळवण्याची ताकद नक्किच वाढेल कारण ओबीसीं मध्ये बरेच हुशार व लढाऊ नेते आहेत….तसेच राजकारणात काम करणारे इच्छुक ही बरेच आहेत….ज्यांना प्लॅटफॉर्म मिळाला की चांगली कामगीरी करू शकतील……म्हणून हा प्रयत्न करायला हरकत नाही अस माझ्या सारख्या ओबीसी ला वाटतय म्हणून मनोगत प्रकट केलंय. पि.के.महाजन. मो.9370867681