कोरोना ; सुंदर समुद्रकिनारे, गड सुनेसुने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- : अलिबाग; राज्यातील पर्यटकांचा आवडता जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनावर कोरोचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात गड, किल्ल्यांबरोबरच समुद्रकिनारे ओस पडले आहे. पर्यटकांची संख्या अचानक रोडावल्याने रिसोर्ट, हॉटेल, खानावळी मालक चिंतेत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर हे समुद्रकिनारे दर शनिवार- रविवारी पर्यटकांनी गजबजलेले असतात. कोरोनाच्या भीतीने ते ओस पडले. कुलाबा किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटनाची संख्याही कमालीची घटली होती,  मुरूड चौपाटीवर पर्यटकांच्या पाऊलखुणा उमटल्याच नाहीत. जंजिरा दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची वाट पाहण्यातच बोट चालकांचा दिवस गेला,  श्रीवर्धन समुद्रकिनारीही पर्यटकांची वाणवा होती. त्यामुळे नौकानयन व इतर जलक्रीडा करणारे पर्यटक पाण्यात दिसलेच नसल्याचे श्रीवर्धन येथील नागरिक  यांनी सांगितले.

माणगाव तालुक्‍यातील देवकुड धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली असून अनेक व्यवसाईकांनी हॉटेल, खानावळी बंद ठेवल्या असल्याचे कुंडलिका भोजनालायचे मालक प्रशांत शेलार यांनी सांगितले.
कुंडलिका नदीवरील रिव्हर राफटिंगसाठी दर शनिवार रविवारी 400 ते 500 पर्यटक येतात; मात्र दोन दिवस पर्यटकांची संख्या 200 सुद्धा पूर्ण नव्हती. अनेक पर्यटकांनी बुकिंग रद्द केली असल्याचे  . अशीच परिस्थिती कर्जत, रोहा, तालुक्‍यात फार्म हाऊस व रिसॉर्ट परिसरात होती. कर्जत स्टेशन व नेरळ एसटी स्टॅंडवर आज अजिबात गर्दी नसल्याची माहिती कर्जत येथील व्यावसायिक यांनी दिली.
त्याचा फटका, स्थानिक खानावळी, अल्पोपाहार केंद्रे, हॉटेल व रिसोर्ट व्यवसायिक, वाहतूकदार आणि रिक्षावाले, गाईड व हमाल यांना बसला, अशी माहिती व्यवसायिकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *