महाराष्ट्र २४- : पुणे – राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 16 कोरोनाग्रस्त पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेची पथकं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. 30 कर्मचाऱ्यांचं एक पथक अशी सुमारे 125 पथकं महापालिकेकडून बनवण्यात आली आहेत. ही पथकं पुण्यात महिन्याभरता आलेल्या देशी-परदेशी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना कोरोनासंदर्भात माहिती देणार आहे.
जिल्ह्यात एखाद्यात लक्षणं आढळल्यास त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारीही या पथकांवर देण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्तालयात त्यावर ड्राफ्ट बनवण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड मध्ये जमावबंदीचा प्रस्ताव कालच जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला होता. आता त्यामधे पुण्यातील काही भागांचाही समावेश होईल. मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बोलणं झालं की जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेने ‘डोअर टु डोअर’ राबवलेल्या मोहिमेत अशा साडे पाच हजार लोकांची माहिती समोर आली आहे. ज्यांनी मागील एक वर्षात परदेशी प्रवास केला आहे, अशा लोकांची माहिती घेऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. गरज पडल्यास त्यांना होम कॉरेंटाइन होण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जात आहे. ही मोहीम ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत तिथून तीन किलोमीटरच्या परिसरात आणि जिथे परदेशातून प्रवास करून आलेले लोक राहत आहेत अशा भागांमध्ये प्रामुख्याने राबवली जात आहे.