महाराष्ट्रात थंडीची लाट… दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । मागील काही दिवसांपासून सुरु झालेला हिवाळ्याचा ऋतू आता खऱ्या अर्थानं राज्यात स्थिरावू लागल्याचं चित्र आहे. यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्य गारठला असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगाव,रायगड,पालघर,मुंबईच्या तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.

धुळ्यात तापमानाचा पारा 5.5 अंश सेल्सिअस वर गेला आहे. जळगाव, रायगड, पालघर, मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. विदर्भातही थंडीची लाट पसरली आहे. अमरावतीत रात्रीच्या तापमानात घट झाली असून, हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम पहायाल मिळत आहे.

थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. तर, उबदार कपडे घालूनच नागरिक बाहेर पडत आहेत. तापमान 12 ते 13 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

परभणीतही पारा चांगलाच घसरला आहे. 9.5 अंश सेल्सिअसवर तापमान खाली उतरला आहे. यंदाच्या मौसमातील हे निच्चांकी तापमान आहे. आणखी पारा घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

वर्ध्यातही नागरिकांना थंडीची हुडहुडी अनुभवता येत आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्यात 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आली आहे. तापमानात घट झाल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर पडतांना दिसते आहे. थंडी वाढल्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे देखील आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *