महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) मोठी घसरण पहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीचं सत्र सोमवारी सुद्धा पहायला मिळालं. सोमवारी बाजार उघडताच Sensex आणि Nifty मध्ये एक मोठी घसरण दिसून आली. प्री ओपन सेशनमध्ये बीएसई सेंसेक्स 500 पॉईंट्सहून अदिक खाली आला आणि 56,500 वर पोहोचला होता. यानंतर बाजार उघडताच सेंसेक्स 675 पॉईंट्सने घसरुन 56,335 पॉईंट्सवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी 218 पॉईंट्सने घसरुन 16765 पॉईंट्सवर पोहोचला. (Share market falls: Sensex slips 1040 points and Nifty 300 points)
गेल्या आठवड्यातही घसरण
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात सुद्धा घसरण पहायला मिळाली होती. सेंसेक्स 1,774.93 पॉईंट्सने म्हणजेच 3 टक्क्यांनी घसरुन 57,011 पॉईंट्सवर बंद झाला होता. तर निफ्टीतही 526 पॉईंट्सने घसरण होऊन 16,985 पॉईंट्सवर बंद झाला होता. दोन आठवड्यांत आलेल्या तेजीनंतर ही घसरण पहायला मिळाली होती.
Sensex plunges 1040 points to trade at 55,971 in the opening session; Nifty at 16,677 pic.twitter.com/AxAI9dKL6R
— ANI (@ANI) December 20, 2021
ओमायक्रॉन आणि ग्लोबल मार्केटचा परिणाम
मार्केट एक्सपर्टच्या मते, जगभरात सुध्या सुरू असलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच गेल्या आठवड्यातही मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली होती. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली स्थितीही भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
तज्ज्ञांचा अंदाज काय?
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच आहे. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधींचं नुकसान झालं असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. अशा प्रकारचे मार्केट करेक्शन होतच असतात आणि अशा मार्केट करेक्शन किंवा फॉलमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.