Horoscope Today दि. १९ फेब्रुवारी २०२६ ; आज गैर समजापासून दूर राहावे..……….. ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १९ फेब्रुवारी २०२६ ||

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
जवळचा प्रवास कराल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
मानसिक चंचलता जाणवेल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आहाराकडे लक्ष ठेवा. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *