महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । गरजेपेक्षा जास्त (अल्ट्रा) प्रक्रियेद्वारे तयार जंक फूडमुळे हृदय, यकृत, स्थूलपणा इत्यादी आजार वाढू लागले आहेत. जंक फूड उत्पादकांकडून शुगर, फॅट व मिठाबाबत याेग्य माहिती दिली जात नाही. हेच विविध आजारांचे कारण ठरू लागले आहे. बीएमजे ग्लाेबल हेल्थमध्ये प्रकाशित लेखानुसार कंपन्या आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी मार्केटिंग रणनीतीचा वापर करतात. त्यामुळे ग्राहक जंक फूडमुळे हाेणाऱ्या त्रासाबद्दल जाणून घेऊ शकत नाहीत. ब्रिटनमध्ये प्रक्रियायुक्त पदार्थांवर वाहतूक दिव्यांसारखे हिरवा, नारिंगी व लाल रंगाचे चिन्ह अनिवार्य नाही. परंतु उत्पादक हे चिन्ह स्वेच्छेने लावतात. परंतु उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती नसते. जंक फूडवर सिगारेटसारखी वापराबद्दलची माहिती द्यावी.
जंक फूडला जास्त काळ वापरासाठी प्रक्रिया
जंक फूडचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापराचा कालावधी वाढवण्यासाठी म्हणजे शेल्फ लाइफला वाढवण्यासाठी डबल-ट्रिपल प्राेसेसिंग केले जाते. त्यामुळे उत्पादनात फॅट, शुगर, साेडियमचे प्रमाण वाढवले जाते. साेबतच चव वाढवणारे हानिकारक फूड केमिकल देखील मिसळले जाते.