83 Box Office Collection Day 1: पहिल्या दिवशी रणवीर सिंहच्या ’83’ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) चित्रपट ’83’ दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काल प्रदर्शित झाला आहे. लग्नानंतर या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. 24 डिसेंबरला हा चित्रपट भारतात अंदाजे 3741 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा क्रिकेटशी निगडीत असल्यानं चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.

हा चित्रपट 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटासह आधीच प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर-मॅन’ आणि ‘पुष्पा’ या चित्रपटांशी 83 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा आहे.चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या नजरा त्याच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर (Box Office Collection) खिळल्या आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट ‘सूर्यवंशी’चा विक्रम मोडीत काढेल अशी अपेक्षा या चित्रपटाकडून होती. परंतु रणवीर सिंहला तसं करता आलं नाही.

83 या चित्रपटाची झालेली चर्चा पाहून असं वाटत होतं की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडू शकतो. परंतु निर्मात्यांना त्याचा तितकाच फायदा झाला नाही. मुंबई, दिल्ली-एनसीआर, कोलकाता आणि बंगळुरूसारख्या मेट्रो शहरांमध्ये या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. परंतु छोट्या शहरांमध्ये 10 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. आता ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळू शकतो,असं म्हटलं जात आहे.

बॉक्स ऑफिसच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, 83 ने पहिल्या दिवशी 14-15 कोटींची कमाई केली आहे. स्पायडर-मॅन आणि पुष्पा आज बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहेत. त्यामुळे 83 ची सुरुवात चांगली मानली जात आहे. वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 83 झेप घेईल असा विश्वास आहे. ‘सूर्यवंशी’ नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे ज्याने मोठी ओपनिंग घेतली आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 26 कोटींची कमाई केली होती.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा ’83’ हा चित्रपट 1983 च्या विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिका पादुकोणने त्यांची पत्नी रोमीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील, दिनकर शर्मा, साहिल खट्टर असे अनेक कलाकार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *