राष्ट्रवादी काँग्रेस ची भूमिका तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा…..मा. श्री. ईश्वर बाळबुधे.

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी – दि. 26-  दिनांक 25 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा सौ. सारीकाताई पवार यांच्या प्रयत्नातून व ओबीसी प्रदेशाध्यक्ष मा. ईश्वरजी बाळबुधे सहीत इतर मान्यवरां च्या उपस्थितीत होटेल घरोंदा हाॅल मोरवाडी येथे राष्ट्रवादी महीला ओबीसी पदाधिकारींची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली…

सदर कार्यक्रमास शहराध्यक्ष श्री. संजोगभाऊ वाघेरे,माजी महापौर सौ. मंगलताई कदम,ओबीसी शहराध्यक्ष श्री.विजय लोखंडे, पक्ष शहर प्रवक्ते फजलभाई शेख ,
पिंपरी-चिंचवड शहराचे निरीक्षक श्री .सचिनभाऊ औटी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पि.चि. शहर उपाध्यक्ष श्रि. पी. के. महाजन , युती अध्यक्षा वर्षाताई जगताप, सामाजिक न्याय विभागाच्या अधक्ष्य गंगाताई धेंडे पिंपरी विधानसभा अध्यक्ष पल्लवीताई पांढरे तसेच भोसरी विधानसभा अधक्ष्या मनीषाताई गटकर ,अर्बन सेल चे अधक्ष्य माधव पाटील इतयादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय ईश्वर जी बाळबुधे म्हणाले की,…. आज ज्या महिलांची निवड झाली …अशा महिलांनी पक्ष संघटना वाढीसाठी राष्ट्रवादी चे विचार व भुमीका तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करावे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सौ. सारिका ताई पवार यांचे काम अतिशय उत्तम असून ओबीसी महिला पक्ष संघटन वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्या काम करत आहेत, याचा नक्कीच पक्षाला फायदा होईल. महिलांवरील अन्याय व अत्याचार विरुद्ध त्यांनी काम करावे ….त्यासाठी पक्षाची नेहमीच त्यांना साथराहील असेही बाळबुधे म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आपल्याला राष्ट्रवादीची सत्ता काबीज करून व पिंपरी-चिंचवड शहराचे भाग्यविधाता विधाते अजित दादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले बघायचे आहे त्यासाठी मा. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व मेहनतीने काम करू या असे सुचवून , निवड झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे प्रतिपादन बाळबुधे यांनी केले…….

यावेळी सौ. सारिका ताई पवार आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की आज ज्या महिलांची निवड करण्यात येत आहे त्यांनी आपल्या पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावेत व अधिकाधिक महिलांना पक्षसंघटनेत सामील करून मा. शरदचंद्र पवार साहेबांचे हात मजबूत करावेत असे आव्हान सौ. सारीकाताई पवार यांनी केले…….

सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शहराची ओबीसी महिलांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये खालील पदाधिकारी महिलांची निवड करण्यात आली.भोसरी विधानसभा अध्यक्षा सुरेखा माळी ,
पिपंरी विधानसभा अध्यक्षा पद्मा सुरेश म्हेत्रे व चिंचवड विधानसभा अध्यक्षा रंजना दर्शले ,
कार्याअधक्ष्य-सुरेखा झिटे,
उपाध्यक्ष -माधवी सोनार ,
उपाध्यक्ष-अंकिता गोरे,
सरचिटणीस-माधुरी गायकवाड,
ह्यामध्ये उपाध्यक्ष , चिटणीस व सरचिटणीस अशी अनेक पदे देऊन महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार व धोरणे जनते पर्यंत पोहचवण्यच्या दृष्टीने महिलांची जम्बो कार्यकारणी करण्यात आली……. सदर कार्यक्रमात
मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष मा. श्रि. पी. के. महाजन यांनी केले
आणि आभार राष्ट्रवादी काँगेस पक्ष युवक चे शहर उपाध्यक्ष श्री. योगेश मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *