रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, आता मिळणार एक्स्प्रेसचे जनरल तिकीट

Spread the love

Loading

 महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी – नाशिक : दि.26 General Tickets of Express : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. एक्स्प्रेसचे जनरल तिकीट मिळणार आहे. मनमाड, नाशिकच्या प्रवाश्यांची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून सर्वसामान्य तिकीट आणि मासिक पासने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांना एकप्रकारे ख्रिसमसची अनोखी भेट दिली आहे.

तब्बल पावणे दोन वर्षांनंतर सर्वसामान्य तिकिटासह पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली.तिकीट खिडकीवर पंचवटीसाठी सर्वसाधारण तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Important news for train passengers, now you will get general tickets of Express)

कोरोनाच्या निर्बंधामुळे पंचवटी एक्स्प्रेस आरक्षण करून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाश्याना मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागत होते. पंचवटी एक्सप्रेसला अनारक्षित तिकिट मासिक पास सुरू करण्याची प्रवाश्यांची मागणी होती.

डी -12 ते डी -17 हे सहा डबे अनारक्षित तिकीट धारकांसाठी राखीव ठेवण्यात आले असून प्रवास करतांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. पंचवटी एक्सप्रेसला सामान्य तिकीट आणि मासिक पास सुरू झाल्याने मनमाड, नाशिक चाकरमानी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *