Ashes Series जिंकल्यानंतरही समाधान नाही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं टीम इंडिया टार्गेट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव करत यजमान टीमनं पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली आहे. या तिन्ही टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार खेळ करत इंग्लंडला पराभूत केले. या विजयानंतरही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची विजयाची भूक शांत झालेली नाही. त्याने निवृत्तीपूर्वी आणखी काही टार्गेट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं नाव डेव्हिड वॉर्नर (David Warner) आहे. ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तामध्ये वॉर्नरची निवृत्तीपूर्वीची इच्छा सांगितली आहे. ‘आम्ही आजवर भारताला भारतामध्ये हरवलेलं नाही. ती मोठी गोष्ट असेल. त्याचबरोबर इंग्लंडलाही इंग्लंडमध्ये हरवायचे आहे. आम्ही 2019 साली सीरिज ड्रॉ केली होती. मला पुन्हा संधी मिळाली तर मी तिथं खेळण्याचा विचार करत आहे, ‘ असे वॉर्नरने स्पष्ट केले.

वयाचा अडथळा नाही!

वॉर्नरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडमध्ये आजवर तीन टेस्ट सीरिजमध्ये 13 टेस्ट खेळल्या आहेत. तसंच त्यानं भारताचा दोन वेळा दौरा केला असून त्यामध्ये 8 टेस्ट खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं या पाचपैकी चार सीरिज गमावल्या आहेत. वॉर्नरचाही या दोन देशांमध्ये रेकॉर्ड खास नाही. त्याने इथं एकही शतक झळकावलेलं नाही. आता हे काम पूर्ण करण्याची 35 वर्षांच्या वॉर्नरची इच्छा आहे. त्यामध्ये वयाचा अडथळा येणार नाही, असंही त्याने स्पष्ट केले.

वॉर्नरनं यावेळी इंग्लंडचा अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसनचं उदाहरण दिलं. ‘माझ्या मते जेम्स अँडरसननं सर्व सिनिअर खेळाडूंसाठी बेंचमार्क सेट केला आहे. मी नेहमीच माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ करण्यावर भर दिला आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टमध्ये ही चांगली बॅटींग केली. मी यापूर्वी देखील चांगल्या टचमध्ये होतो, पण मला रन काढता येत नव्हते. नव्या वर्षात मी आणखी जास्त रन करेल, अशी आशा वॉर्नरनं व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *