मुंबई-पुण्यासह या शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । कोरोनातून सावरलेले बांधकाम क्षेत्र (Construction FIeld) आता पूर्वस्थितीत आल्यानंतर पुणे वगळता देशातील काही शहरांतील घरांच्या किमतीत (House Rate) वाढ होत आहे. जगभरातील १५० शहरांमध्ये निवासी बांधकामांच्या किमती २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत वर्षानुवर्षांच्या सरासरीनुसार १०.६ टक्के वाढल्या (Increase) आहेत. २००५ च्या पहिल्या तिमाहीपासून झालेली ही सर्वात जलद दरवाढ आहे.

‘नाईट फ्रँक’च्या ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्सच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत ९३ टक्के शहरांतील घरांच्या किमती वाढल्या आहेत. ४४ टक्के शहरांत २०२० च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत दोन अंकी दरवाढ नोंदविली आहे. हैदराबाद शहर घरांच्या किमतीत २.५ टक्के वर्षानुवर्षे वाढी बरोबर १२८ व्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत स्तरावर हैदराबादमध्ये जास्त वाढ नोंदवली गेली आहे. तर चेन्नई २.२ टक्क्यांच्या वाढीसह जागतिक स्तरावर १३१ व्या क्रमांकावर आहे. निवासी मालमत्ता वर्गात अनुक्रमे १.५ टक्के आणि ०.४ टक्के किंमत वाढीसह ग्लोबल इंडेक्सवर कोलकता १३५ व्या आणि अहमदाबाद १३९ व्या क्रमांकावर आहे. तुर्कीचे इझमीर शहर ३४.८ टक्के सर्वोच्च वाढीसह आघाडीवर आहे. त्यानंतर न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहरात किमती ३३.५ टक्के वाढल्या आहेत.

पुणे-मुंबईसह काही शहरांत झाली घट :

घरांच्या किमतींमध्ये १.८ टक्के घट नोंदवत मुंबई हे ग्लोबल रँकिंगसह सर्वात खालच्या क्रमांकावर (१४६) असलेले शहर आहे. बंगळूर ०.२ घसरणीसह १४० व्या स्थानावर आहे. त्यानंतर दिल्ली ०.७ घसरणीसह १४२ व्या क्रमांकावर आहे. पुण्यातील घरांच्या किमतीत देखील १.५ टक्के घट झाली आहे. या यादीत पुणे १४४ व्या क्रमांकावर आहे.

केंद्र सरकारने घर खरेदीसाठी दिलेली प्रोत्साहन, वाढलेली घरगुती बचत, कमी व्याजदर यामुळे घरांची मागणी कायम आहे. घरांची विक्री वाढवण्यात किमतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागणी वाढत गेल्यानंतर अनेक बाजारपेठांमध्ये निवासी मूल्ये स्थिर झाले आहे. आता स्थिर आणि वाढ याच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. व्याजदर, ओमिक्रॉनचा प्रभाव आणि महागाईचा दबाव यासारखे घटक खरेदीदारांच्या भावना निश्चित करतील. आम्‍हाला आशा आहे की, सरकार निवासी बांधकामाच्या विक्रीची गती कायम ठेवण्‍यात मदत करण्‍यासाठी सध्‍याचे आर्थिक वातावरण कायम ठेवेल.

या वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत घरांच्या किमतीत झालेले बदल :

शहर – बदललेल्या किमतीची टक्केवारी

इझमीर – ३४.८

विलिंगटन – ३३.५

हैदराबाद – २.५

चेन्नई – २.२

कोलकत्ता – १.५

अहमदाबाद – ०.४

बंगळूर – ०.२

दिल्ली – ०.७

पुणे – १.५

मुंबई – १.८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *