महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून सांगितली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.’
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन करताना म्हटलं की, काळजी घेण्याचं कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती, तसंच काळजी घ्या असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.