वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 भाविकांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी । जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir, Katra) माता वैष्णो देवी मंदिरातून धक्कादायक बातमी समोर आली असून मंदीर परिसरात असलेल्या भवनात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत तब्बच 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 13 भाविक जखमी झाल्याचं समजतंय. ही घटना पहाटे 2.45 च्या सुमारास घडल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. (Stampede at Mata Vaishno Devi Bhawan)

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही कारणावरून झालेल्या वादातून भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. कटरा हॉस्पिटलचे बीएमओ डॉ. गोपाल दत्त यांनी मृत्यूची पुष्टी केली आहे. सध्या जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. नववर्षानिमित्त येथे मातेच्या दर्शनासाठी भाविक पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *