२०२२ Gold Rate Today ; सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – कमॉडिटी बाजारात धडकलेल्या तेजीने सोने आणि चांदी झळाळून निघाली आहे. एमसीएक्सवर सोनं २०० रुपयांनी तर चांदीमध्ये ५५० रुपयांची वाढ झाली.इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सराफा बाजारात सोन्याचा भाव ४७७९८ रुपये आणि एक किलो चांदीचा भाव ६११३३ रुपये होता. मागील आठवडाभरात सोनं ५०० रुपयांनी महागले होते.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोन्याचा भाव ४८०८३ रुपयांवर स्थिरावला. सोने दरात १९८ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी शुक्रवारच्या सत्रात सोने ४८१३४ रुपयांपर्यंत वाढले होते. कालच्या सत्रात चांदीमध्ये देखील मोठी वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६२६८१ रुपये इतका वाढला. त्यात ५२१ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी चांदीने ६२७१७ रुपयांचा स्तर गाठला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०२० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४९०२० रुपये इतका आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२६० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१५३० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५५९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९७३० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८६० रुपये इतका आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *