अक्षयकडून गायत्री मंत्रोच्चार तर बिग बींची खास पोस्ट; पाहा असं केलं बॉलिवूड कलाकारांनी नवीन वर्षाचं स्वागत

 108 total views

महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – आज 2022 या वर्षाची सुरूवात झाली. काल(31 डिसेंबर) बॉलिवूडमधील काही कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केले. जाणून घेऊयात अक्षय कुमार(Akshay Kumar),अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी कशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत केले.

अक्षय कुमारने म्हणले गायत्री मंत्र
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे मालदीवला गेले होते. मालदीवमध्ये सूर्योदयाच्या वेळी गायत्री मंत्रोच्चार करतानाचा व्हिडीओ अक्षय कुमारने शेअर केला. या व्हिडीओला अक्षयने कॅप्शन दिले, ‘नव्या वर्षाची सुरूवात, मी सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’

अमिताभ बच्चन यांची हटके पोस्ट
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांचा खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमिताभ यांनी कानात हेडफोन्स घातलेले दिसत आहेत. अमिताभ यांनी या फोटोला कॅप्शन दिले, ‘1.1.22.’ अमिताभ यांना इन्स्टाग्रामवर 29 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा रोमँटिक फोटो
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर पती निक जोनससोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सैफ अली खान
सैफ अली खाननं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सैफच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली. सैफची बहिण सोहा अली खानने या पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *