Maharashtra Corona | महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, दिवसभरात तब्बल 9170 नवे रुग्ण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी । महाराष्ट्रावरचं कोरोना संकट(Maharashtra Corona) आणखी गडद होताना दिसत आहे, कारण राज्यात आज दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे. विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. दिवसभरात सात रुग्णांच्या मृत्यूंची (Corona Death) नोंद झाली आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा 2.19 टक्के इतका आहे. तर दिवसभरात 1445 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 6 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 3, पिंपरी चिंचवड येथील 2 तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 460 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,067 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज हाच आकडा 9 हजार 170 वर पोहोचला आहे. त्यापैकी मुंबई शहरातच 6347 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील कोरानाबाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत दोन दिवसांपूर्वी 3671 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हाच आकडा थेट 6347 वर पोहोचला आहे.

मुंबईत आज दिवसभरात 6347 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 5712 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. तर 389 रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तसेच दिवसभरात 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात 47 हजार 978 नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. पुण्यात काल 400 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज देखील जवळपास तेवढेच रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 399 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक पुण्यातील तर दुसरा पुण्याबाहेर रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुण्यात सध्या 2070 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 92 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *