इलेक्ट्रिक वाहनधारकांना बसणार सेवा शुल्काचा शॉक, प्रतियुनिटमागे सेवा शुल्कापोटी 3 रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना सेवा शुल्काचा शॉक बसणार आहे. चार्जिंग स्टेशनवर गाडी चार्ज केल्यानंतर वाहनधारकांना विजेच्या किमतीशिवाय प्रतियुनिटमागे सेवा शुल्कापोटी शहरी भागात 3 रुपये तर ग्रामीण भागात 2 रुपये 30 पैसे मोजावे लागणार आहेत. चार्जिंग स्टेशनच्या उभारणीबाबत नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या महावितरणने शुल्क निश्चित केले आहे.

विजेवरील वाहनधारकांची वाहन चार्जिंग करण्याबाबत गैरसोय होऊ नये म्हणून महानगरांबरोबरच महामार्गांवर महावितरणसह खासगी वीज कंपन्या आणि इतर व्यावसायिकांकडून चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. त्यानुसार महावितरणच्या चार्जिंग स्टेशनवर वाहनधारकांना 5 रुपये 50 पैसे दराने वीज उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच इतर खासगी चार्जिंग स्टेशनवरील विजेचे दरही पाच-सहा रुपये एवढे असणार आहेत. तर सेवाशुल्क 3 रुपयांपर्यंत निश्चित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *