महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । कश्मीर खोऱ्यातील कुपवाडा येथील नियंत्रणरेषा ओलांडून भारतात घुसखोरी करणाऱया पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमला (बॅट) भारतीय लष्कराने शनिवारी रात्री जोरदार हिसका दिला. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात एक जवान ठार झाला असून तो पाकिस्तानी सैनिक असल्याचे उपलब्ध पुराव्यावरून स्पष्ट झाले आहे. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याशी संपर्क साधत मयत जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास बजावले आहे.
पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमने काल शनिवारी रात्री एलओसीवरील किरण सेक्टरमधून भारतीतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला. यावेळी भारतीय चौक्यांना लक्ष्य करणाऱया पाकिस्तानी बॅटच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने जशास तसे प्रत्युत्तर दिले. घुसखोरी उधळल्यावर एलओसीवरून एक मृतदेह ताब्यात घेण्यात आला.