यामुळे रतन टाटांनी घेतला अविवाहित राहण्याचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 4 जानेवारी । आपल्या समाजकार्यामुळे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे रतन टाटा हे जास्त चर्चेत असतात. रतन टाटांविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष आदर आहे. आतापर्यंत अनेक स्टार्टअप्सना रतन टाटा यांनी आर्थिक पाठबळ दिले आहे आणि हे स्टार्टअप्स आता आपापल्या क्षेत्रात आघाडीवरही आहेत. टाटा ग्रुपला रतन टाटा यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. टाटा यांनी उद्योग क्षेत्रात खूप नाव कमावले, पण प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यांना यश मिळाले नाही. कामाप्रती एकनिष्ठ असणाऱ्या रतन टाटांनी लग्न केलेले नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधी प्रेम झालेच नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः रतन टाटा यांनी याबद्दल उल्लेख केला आहे. एक दोन नाही तर तब्बल ४ वेळा त्यांना प्रेमाचा अनुभव येऊन गेला आहे. परंतु त्यांना त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहचवता आले नाही.

रतन टाटा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की त्यांना प्रेम झाले होते, पण ते त्यांच्या प्रेयसीसोबत लग्न करू शकले नाहीत. त्यांनी सांगितले, त्यांच्यासाठी भविष्याचा विचार करता अविवाहित राहणे योग्य ठरले. कारण जर त्यांनी लग्न केले असते, तर परिस्थिती फारच जटिल झाली असती. ४ वेळा लग्नाचा गंभीरपणे विचार रतन टाटा यांनी केला. पण कोणत्या ना कोणत्या भीतीने ते मागे पुन्हा आले. ते जेव्हा अमेरिकेत काम करत होते, तेव्हा ते प्रेमाच्या बाबतीत फारच गंभीर होते. पण रतन टाटा पुन्हा भारतात आले म्हणून ते त्यांच्या प्रेयसीसोबत लग्न करू शकले नाहीत.

पण त्यांची प्रेयसी भारतात यायला तयार नव्हती. त्यावेळी भारत-चीन युद्ध देखील सुरु होते. शेवटी त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतच दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले. त्यानंतर रतन टाटा यांनी आपल्या प्रेयसीबद्दल पुढे सांगण्यास नकार दिला. रतन टाटा यांचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला, परंतु त्यांचे आयुष्य एवढे सहज नव्हते. रतन टाटा अवघे ७ वर्षांचे असताना त्यांचे आईवडील विभक्त झाल्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *