महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 4 जानेवारी । ओबीसी आरक्षणाला ज्यांनी सुरूवातीपासूनच विरोध केलाय त्यांचा निषेध करण्याऐवजी ज्या ज्या ओबीसीं तत्कालीन वेळेला लढा दिला त्यांचे नामोनिशाणच मिटवने कितपत योग्य आहे? महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब म्हणतात ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात ओबीसी नव्हतेच. ओबीसींसाठी मागासवर्गीय रस्त्यावर उतरलेत असे ही माननीय मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात. एक खरे आहे की ओबीसींसाठी मागासवर्गीय रस्त्यावर उतरलेत यात काहीच दुमत नाही. परंतू ओबीसींनी काहिच केले नाही अस कस म्हणता येईल बर ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून पण तुम्हीही ओबीसीच आहात शिवाय धडाडीचे नेते म्हणून तुमची ख्याती आहे म्हणून तुम्हीच खुलासा करावा की तुम्ही ओबीसींच्या न्याय व हक्कांसाठी तुम्ही काय हात पाय हलवलेत ते आधी जनतेला कळू द्यावे ? बोलायचा अधिकार प्रत्येकाला आहेच आपण तर मंत्री आहात ते ही ओबीसी आहात म्हणून आपणाकडून असे वक्तव्य अपेक्षीत नाही की ओबीसी लढ्यात ओबीसी नव्हतेच मान्य आहे.
सन्माननीय डाॅ. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींसाठी मोर्चा काढून आवाज उठवला आहे . त्यांचे त्या बद्दल आभार मानावेच लागेल. याचा अर्थ असा नाही की इतर ओबीसी नेत्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत . ओबीसींच्या हक्कांबाबत पोट तिडकीने लढणारे व लढा उभारणारे माननीय मंत्री भुजबळ साहेब आहेत तसेच आपापल्या परीने लढणारे इतरही नेते आहेत तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून प्रबोधन करून विचारवंत श्री. हरी नरके, श्री. राव साहेब कसबे, श्री.उत्तम कांबळे व श्री. बापू भुजबळ आहेत तसेच श्री. लक्ष्मण हाकेंसारखे हितचिंतक आहेत जे जागोजागी मार्गदर्शन करीत आहेत व इतर मागासवर्गीय आयोगावरही ते काम करीत आहेत तसेच अनेक छोटे मोठे सामाजिक कार्यकर्तेही भरपुर आहेत. परंतु त्यांचा लढा अपुरा पडत आहे असे आपण म्हणू शकता परंतू त्यात आपण स्वतःही आहातच. याचे भान ठेवून मंत्री महोदयांनी वक्तव्य करावीत. जे ओबीसी लढत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी कमकुवत करायचे काम करू नये हीच अपेक्षा मी स्वता; ओबीसी आहे. आपले मत ओबीसींचे खच्चीकरण करणारे वाटत आहे आणि ते आत्ताच्या घडीला तरी योग्य नाही. पि.के.महाजन.