महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । राज्य सरकारने गुंठेवारीतील बांधकामे (Gunthewari Construction) नियमित करण्याचा आदेश ऑक्टोबर महिन्यात दिला होता. त्याची अंमलबजावणी पुणे महापालिकेने (Pune Municipal) सुरू केली नव्हती. अखेर ही प्रक्रिया सोमवारपासून (Moday) (ता. १०) सुरू होणार आहे. ही नोंदणी ऑनलाइन (Online Registration) होणार असून, यासाठी नागरिकांनी आर्किटेक्टची मदत घेऊन त्यांचा प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. पुढील तीन महिने अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
पुणे महापालिकेत सोमवारी गुंठेवारीतील बांधकामे नियमीत करण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. महापौर म्हणाले, बांधकामे नियमित करण्यासाठी पद्धती निश्चित केली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांसह जुन्या हद्दीतील सर्व अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. पुढील तीन महिने अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर एकत्रित सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे.
यासाठी प्रतिगुंठा सुमारे १५०० रुपये शुल्क निश्चीत केले आहे. गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करताना कोणत्याही एजंटकडे जाऊ नये. आर्किटेक्टच्या मदतीने ऑनलाइन अर्ज करावेत. त्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ नयेत, अशी सूचना दिल्या.
या बांधकामांना दिलासा नाही…
रेड, ग्रीन झोन, बीडीपी, हिल टॉप, हिल स्लोप, शेती झोन
ना विकास झोन, आरक्षण, विकास आराखड्यातील रस्त्यावरील बांधकामे, नदीपात्र
सरकारी जागेवरील बांधकामे तसेच अंशतः बांधकामे