IND vs SA: पावसामुळे टीम इंडियाचा विजय पक्का ? समजून घ्या, आता पीचवर काय घडू शकतं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । जोहान्सबर्ग कसोटीत दोन्ही संघांना सम-समान संधी आहे. टीम इंडियाला विजयासाठी आठ विकेट काढण्याची गरज आहे, तर दक्षिण आफ्रिकेला 122 धावा बनवायच्या आहेत. 122 धावा जास्त नाहीयत, पण जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर आता धावा बनवणं खूप कठीण होणार आहे. कारण तिथे पाऊस सुरु आहे. या पावसाचा टीम इंडियाला फायदा होऊ शकतो.

पावसामुळे जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर ओलावा असेल. ओलसर खेळपट्टीवर फलंदाजी करणं इतकं सोप नसतं. फटके खेळताना संघर्ष करावा लागतो. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीला तडे सुद्धा गेले आहेत. त्यामुळे चेंडू वर-खाली राहतोय. हेवी रोलरमुळे पहिला तासभर फलंदाजी करणं सोप असतं. पण पावसामुळे असं होण अवघड आहे.पावसाळी वातावरण, हवा आणि ढगाळ हवामान नेहमी वेगवान गोलंदाजांच्या पथ्यावर पडतं. मोहम्मद शमी सीम पोजिशन कमालीची आहे. त्याचवेळी शार्दुल ठाकूर चेंडू स्विंग करु शकतो. पावसाळी वातावरणात हे गोलंदाज धोकादायक ठरु शकतात.

दक्षिण आफ्रिकेत पावसानंतर चेंडू स्विंग होत नाही. चेंडू पीचवर पडल्यानंतर जास्त सीम होतो. तो खेळणे फलंदाजासाठी सोपे नसते. दक्षिण आफ्रिकेची कमी अनुभव असलेली फलंदाजी ढेपाळू शकते.जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्यादिवशी खेळपट्टीकडून अश्विनला मदत मिळाली होती. चेंडू उसळी बरोबर भरपूर वळत होता. आज खेळ सुरु झाला, तर अश्विनही घातक ठरु शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *