महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; मुंबईत रोज मोठय़ा संख्येने प्रवासी परदेशातून येत आहेत. त्यापैकी ज्यांना सर्दी तापाची लक्षणे आहेत, अशा प्रवाशांना विलगीकरण कक्षात पाठवले जाते. तर ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत अशा लोकांना घरातच वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. मात्र येत्या काही दिवसात तब्बल २५ हजार इतक्या मोठय़ा संख्येने मध्य आशियातून अडकलेले प्रवासी मुंबईत येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण कक्ष तयार करावे लागणार आहेत. या प्रवाशांसाठी मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आव्हान पालिकेला पेलावे लागणार आहेत.