महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पुणे- काेराेना रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात सध्या डाॅक्टर, नर्स उपचार करत असून या गंभीर राेगाचा सामना रात्रंदिवस काम करून ते करत आहेत. डाॅक्टर, नर्स यांचा जीव महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकारने करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील काेराेना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर, नर्सचा विमा लवकरच काढला जाणार असून त्याबाबत मुंबईत निर्णय घेऊन जीआर काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली आहे.
पवार म्हणाले, राज्यात काेराेना बाधितांची संख्या ५२ झाली आहे. शासनाने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अातापर्यंत काढलेल्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी ही ३१ मार्चपर्यंत हाेणार हाेती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ती शासनाचा पुढील आदेश निघेपर्यंत अनिश्चित काळासाठी लागू असणार आहे. अंत्यविधी, दहाव्या, तेरावा या कार्यक्रमाच्या ठिकाणी लाेकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. लग्नाच्या तारखा पुढे ढकलणे आवश्यक असून सदर तारखा पुढे न ढकलल्यास २५ लाेकांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा पार पाडावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले