राज्यात शेतकऱ्यांच्या चिंतेत भर , ‘या’ जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण नगरकरांनी आज अनुभवले.

हिंगोली जिल्ह्यात असलेल्या ग्रामीण परिसरात आज पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यामुळे रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली असून या हंगामात येणाऱ्या हरभरा, ज्वारी, गहू या पिकांवर धुक्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता या धुक्यामुळे पुन्हा संकट आलं आहे.

हिंगोली जिल्ह्यासोबतच नांदेडसह इतरही जिल्ह्यात पहाटे धुक्याची दाट चादर बघायला मिळाली. मागील ५० वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कधी असे दुखी पाहिले नाही ही भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दाट धुक्‍याचा परिणाम ज्वारीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. सध्या मराठवाड्यातील ज्वारीची पिकाचे कणीस आणि त्यातील ज्वारीचे काळेकुट्ट पडू लागले आहेत. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हरभरा पिकावरसुद्धा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा झाला आहे. उत्पादनात घट येणार हे नक्की आहे. ज्वारीचा पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. कर यांना खरीप हंगामातील अजूनही पिक विमा मिळाला नाही. रशिया शेतकऱ्यांनी सुद्धा विमान मिळण्याची विनंती केली आहे. हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आजही धुक्याची चादर अनुभवली आहे. एवढे धुके दाट होती की १५ फुटापर्यंत पलिकडचे सुद्धा काही दिसत नव्हते. तर काही ठिकाणी वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *