महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी कायम आहे. सोने ४८ हजारांच्या आसपास असून चांदीचा भाव ६१ हजारांवर आहे. आज सोने ७० रुपयांनी तर चांदी १८८ रुपयांनी महागली आहे. यापूर्वी शुक्रवारी सोने दरात २६० रुपयांची तर चांदीमध्ये २५० रुपयांची वाढ झाली होती.
आज सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७८५४ रुपये इतका वाढला आहे. त्यात ७६ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी आजच्या दिवसात सोन्याचा भाव ४७८५७ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१७९१ रुपये इतका असून त्यात १८८ रुपयांची वाढ झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४९१०० रुपये इतका आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१३० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१४२० रुपये आहे.आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५३४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४४० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८८० रुपये इतका आहे.