Rohit Patil | ‘निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही’ असं रोहित पाटील म्हणाले होते, झालंही तसंच

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवळेमहाकांळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना केलेलं विधान तंतोतंत खरं ठरलंय. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं. निवडणूक निकालानंतर अगदी तसंच झालंय. रोहित पाटील यांनी कवठेमहाकांळ नगरपंचायीतवर विजयी झेंडा फडकवला आहेच. या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय. आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय. कवठेमहाकांळ नगरपंचायतीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत नगरपंचायतीवर विजय मिळला आहे.

कवठेमहांकाळमध्ये पाणी प्रश्नवर सगळ्यात आधी काम करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे. कवठेमहाकाळमधील पाणी प्रश्न अजूनही काही ठिकाणी कायम आहे. त्याच प्रश्नावर सुरुवातील सोडवण्यासाठी आम्ही आधीच काम करायला सुरुवात केली होती. आताही तेच काम सगळ्यात आधी तेच काम पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत, असंही ते म्हणालेत. आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी त्यांनाच दिलंय.

या निवडणुकीत काही प्रसंग असे होते, की आम्हाला अनेकदा प्रचार करु दिला नव्हता. संघर्ष पेटला होता. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. या निवडणुकीत झालेला विजय हा कवठेमहाकाळमधील लोकांचा विजय आहे, असं रोहित पाटील यांनी म्हटलंय. लोकांच्या प्रश्नांवरच आम्ही लढलो. सातत्यानं आम्ही लोकांमध्येच राहिलो होतो. लोकांच्या प्रश्नांचं आम्ही निरसन करत गेलो, त्यामुळे लोकं आमच्या पाठीशी उभी राहिली. कवळेमहाकाळ शहरात निवडणूक लढवत असताना आपलं शहर कसं असलं पाहिजे आणि आजपासून पुढच्या वीस-तीस वर्षात शहर कसं डेव्हलप झालं पाहिजे, याचं व्हिजन आम्ही ठेवलंय. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर व्यक्त केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *