Maharashtra Petrol-Diesel Price Today : राज्यातील मोठ्या शहरांतील आजचे पेट्रोल डिझेल दर काय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. दोन महिन्यांपासून अधिक काळ झाला आहे. परंतु, इंधन दरांमध्ये कोणताही खास बदल झालेला नाही. देशासोबत राज्यातही पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. आज देशात सलग 76 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत…

केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर 94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर 94.28 रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर 92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर 92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर 93.90 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *