ICC ODI Team : टी20 प्रमाणे एकदिवसीय संघातही भारतीयांना स्थान नाही, बाबरकडे नेतृत्व

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) वर्ष 2021 च्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संघामध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेलं नाही. विराट, रोहित, बुमराह आणि जाडेजा यांना आयसीसीच्या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. भारताशिवाय, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघातील एकाही खेळाडूला संघात स्थान मिळालेलं नाही. आयसीसीने निवडलेल्या संघामध्ये पाकिस्तान, आयरलँड, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका संघातील प्रत्येकी दोन दोन खेळाडूंचा समावेश आहे. या संघात सर्वाधिक बांगलादेशच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या बाबर आजमकडे आयसीसीने एकदिवसीय संघाचे नेतृत्व दिले आहे. आयसीसीने एकदिवसीय आणि टी२० संघामध्ये एकाही भारतीय संघाला स्थान दिले नाही. 2021 मध्ये भारतीय संघाने खूप कमी एकदिवसीय सामने खेळे होते. तर टी२० विश्वचषकात खराब कामगिरी झाली होती. त्यामुळेच आयसीसीने एकदिवसीय आणि टी२० संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिले नाही.

आयसीसीने निवडलेला 2021 चा एकदिवसीय संघ
पॉल स्टर्लिंग, जानेमन मलान, बाबर आजम (कर्णधार), फखर जमान, रसी वान डर डुसेन, शाकिब अल हसन, मुश्फिकुर रहीम, हसरांगा, मुस्तफिजुर रहमान, सिमी सिंह आणि डी. चमीरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *