महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी14 दिवसांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळं अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम कारावा लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांना 2 नोव्हेबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास तीन महिन्यापासून अनिल देशमुख ऑर्थर रोड जेलमध्ये आहेत.
Maharashtra's ex-Home Minister Anil Deshmukh's judicial custody extended by another 14 days. He was arrested by ED on November 2nd, 2021 in connection with extortion and money laundering allegations against him.
He is currently lodged at Arthur road jail in Mumbai.
— ANI (@ANI) January 20, 2022
मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीनं पाच वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. यानंतर त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली. याचदरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीनं त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळं राज्यात एकच खळबळ माजली होती.