महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच मोठ्या पडद्यावर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांच्या या नव्या चित्रपटावरुनच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात काम करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी विरोध केला आहे.