Corona : कोरोनामुळे चालू वर्षातील 23% नागरिक नव्या नोकरीच्या शोधात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । कोरोना महामारीमुळे पोळल्या गेलेल्या अमेरिकेमध्ये मागील काही महिन्यांपासून राजीनाम्याची लाट आली आहे. अनेकांनी विविध कारणांमुळे आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण तिकडे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. आणि याच प्रकरणाला तिकडे आता ग्रेट रेझिग्नेशन असे संबोधले जात असून कमीजास्त प्रमाणात हा ट्रेण्ड भारतात देखील दिसू लागला आहे.

अमेरिकेत 2020 मध्ये अमेरिकेत राजीनामा (Resigned) सत्राला सुरुवात झाली. 2021 मध्ये साडेसात कोटी नागरिकांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून राजीनामा दिलेल्यांपैकी 23 टक्के नागरिक चालु वर्षात नव्या नोकरीच्या (Job) शोधात असणार आहेत.

Corona : कोरोनामुळे आलेय राजीनाम्याची लाट; चालू वर्षातील 23% नागरिक नव्या नोकरीच्या शोधात
Mobile चोरीला गेल्यास कसा शोधायचा? अन् मोबाईलमधील महत्वाची अकाउंट कसे ब्लॉक करायचे? वाचा
दरम्यान, आरोग्य, स्वागत क्षेत्र, सामाजिक मदत, वेअरहाऊसिंग या क्षेत्रातील लोकांचं नोकरी सोडण्याचे प्रमाण ज्यादा आहे. नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण आपल्या देशात अमेरीकेच्या तुलनेत कमी असले तरी चिंताजनक आहे. तसेच कमी पगारावर राबणाऱ्या लोकांनी राजीनामा देण्याचे प्रमाण मोठे आहे. नोकरी सोडण्यामागे सध्याच्या नोकरीचा आलेला कंटाळा हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

तर नोकरी सोडण्याची कारणं पुढील प्रमाणे.

कमी वेतन : 67%

करिअरमधील मर्यादित संधी : 66%

वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली न जाणे : 65%

सहकाऱ्यांशी संबंध – 64%

आरोग्याची देखभाल घेतली न गेल्याने : 63%

कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा : 64%

अन्य क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी : 62%

सहकारी सोडून गेले म्हणून – 54%

दरम्यान 51% लोक तर कोणताही अनुभव नसलेल्या क्षेत्रात नोकरी शोधत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *