महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून बंद असलेला द्वारकामाई मंदिराचा दरवाजा खुला करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून द्वारकामाई मंदिराचा दरवाजा खुला करावा; यासाठी साईभक्तांसह शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांची मागणी होती. भाविकांच्या मागणीला आज यश मिळाले असून साई भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (shirdi news the closed door of Dwarkamai temple is open for Darshan)
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सर्वच मंदिरांचे द्वार बंद होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मंदिर खुले करण्यात आली होती. त्यानुसार शिर्डी येथील साईबाबा (Shirdi SaiBaba) दर्शनाचे द्वार देखील खुले करण्यात आले होते. परंतु, येथीलच द्वारकामाईचा दरवाजा बंद होता. मागील दोन वर्षांपासून हे द्वार बंद होते.