(MSBSHSE) दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 130 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ जानेवारी । दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केले आहे. माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२२ पासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होतील आणि १४ मार्चपर्यंत चालतील. तर, १४ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान बारावीच्या परीक्षा होतील. तथापि, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अपडेट्ससाठी, तुम्ही एमएसबीएसएचएसईच्या (MSBSHSE) अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in ला भेट देऊ शकता.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चला सुरु होणार असून ती ३० एप्रिलपर्यंत चालेल.

दहावी आणि बारावीचे जवळपास ३५ लाख विद्यार्थी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२२च्या परीक्षांना बसण्याची शक्यता आहे. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व नियम पाळले जातील, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *