Weather Alert! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ जानेवारी । ऐन हिवाळ्यामध्ये मागील काही दिवसापासून महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी (rainfall) लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना देखील राज्यामध्ये (state) परत एकदा अवकाळी पावसाचे (rain) ढग निर्माण होत आहेत. आज पासून पुढील ३ दिवसामध्ये मुंबई (Mumbai) पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसून येत आहे.

हवामान विभागाने (Meteorological Department) आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार (Nandurbar) या ४ जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानाची (weather) नोंद करण्यात आली आहे. आज सकाळापासूनच येथे ढगाळ हवामान आहे. पुढील २ ते ३ तासात या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर उद्या राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अगोदर पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीने येथील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. यातच परत एकदा येथे अवकाळी पावसाचे ढग निर्माण होत आहेत.

उद्या मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव (Jalgaon) आणि नंदुरबार या ११ जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. परवाच्या दिवशी (रविवारी) राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार असून यादिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या २ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

२३ जानेवारी नंतर राज्यामध्ये पुण्यासह (Pune) उत्तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा (maharashtra) वाढण्याची शक्यता आहे. हा थंडीचा जोर पुढील २ दिवस कायम राहणार आहे. यानंतर राज्यात हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आज पाषाण याठिकाणी सर्वात कमी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याच बरोबर हवेली येथे १०.३, शिवाजीनगर ११, शिरूर ११.१, एनडीए ११.१, तळेगाव ११.३, माळीण ११.४, राजगुरूनगर ११.४ आणि इंदापूर याठिकाणी ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *