महत्वाची बातमी : फ्रान्सने शोधलं कोरोनावर औषध, 6 दिवसात रुग्ण बरा करण्याचा दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : पॅरिस : सर्व जगात सध्या फक्त एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे कोरोनाची. कोरोनावर औषधच उपलब्ध नसल्याने जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. आता फ्रान्सच्या एका तज्ज्ञांनी त्यावर औषध शोधून काढल्याचा दावा केलाय. फ्रान्सच्या इन्स्टीट्यूट हॉस्पिटलो विद्यापीठाचे संशोधक डिडायर राओ यांनी हा दावा केला आहे. सुरुवातीच्या ट्रायल्समध्ये 6 दिवसांत रुग्णांमध्ये चांगला बदल झाल्याचं आढळून आलं असा त्यांचा दावा आहे. फ्रान्स सरकारने त्यांच्यावर कोरोनावर लस संशोधन करण्याची जबाबदारी दिली होती.

मलेरियावर वापरलं जाणारं Chloroquine या औषधाचा वापर करून हे नवं औषध तयार केल्याचा दावा केला जात आहे.

तर लंडनमध्येही नवं संशोधन झालं आहे. आतापर्यंत कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) निदान करण्यासाठी ज्या चाचण्या (test) केल्या जात आहेत, त्यांचा रिपोर्ट येण्यासाठी तब्बल 2 तास लागत होतं. मात्र आता अशी चाचणी विकसित करण्यात आली आहे, ज्यामुळे अवघ्या 30 मिनिटांतच कोरोनाव्हायरसचं निदान होऊ शकतं.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी कोरोनाव्हायरससाठी रॅपिड टेस्टिंग टेक्नॉलॉजी (rapid testing technology ) तयार केली आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरस आहे की नाही, हे फक्त 30 मिनिटांत समजतं.

या नव्या टेस्टसाठी फक्त हिट-ब्लॉकची गरज आहे, जे RNA आणि DNA च्या तापमानासाठी गरजेचं आहे. बाकी या टेस्टसाठी इतर कोणत्याच उपकरणाची गरज नाही. फक्त नमुन्याचा रंग बदल पाहून कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह हे फक्त डोळ्यांनीच ओळखता येणार आहे. ही टेस्ट ग्रामीण भागात किंवा आरोग्य केंद्रांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकते, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *