राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पुण्यात अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : पुणे ; सराफ व्यावसायिकाला 50 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पै. मंगलदास बांदल यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विभागाने ही कारवाई केली आहे. फिर्यादीला व्हिडीओ क्लिपिंग दाखवून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणे, असा आरोपही मंगलदास बांदल यांच्यावर आहे.

पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना अखेर शनिवारी अटक करण्यात आली.

या प्रकणात आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना यापूर्वी खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *