एसी बंद ठेवा! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : पुणे ; कोरोना व्हायरस थंड ठिकाणी जास्त काळ जिवंत राहतात. हे लक्षात घेता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनेनुसार खबरदारी म्हणून वातानुकूलित यंत्रणेचा वापर क.मी करावा किंवा टाळण्यात यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांतील वातानुकूलित यंत्रणेचा वापर करण्यात येऊ नये अथवा गरजेपुरताच वापर करावा. शक्यतो दरवाजे, खिडक्या उघडय़ा ठेवून जास्तीत जास्त वायुविजन होऊ देणे हादेखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक प्रभावी आणि प्रतिबंधक उपाय असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही वातानुकूलित सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवर धावणारी एसी लोकल तसेच काही लांब पल्ल्याच्या वातानुकूलित गाडय़ांची सेवा मार्चअखेरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *