बजेट 2022 : कधी सादर होणार अर्थसंकल्प? जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । भारतातील ओमिक्रॉनचे (omicron) संक्रमण अचानक वाढत असताना, सर्वांचे लक्ष यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे (budget 2022) लागले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची (coronavirus) वाढती प्रकरणे आणि संसदेचे शेकडो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह येत असल्यामुळे 2022 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख आणि वेळ याविषयी तुम्ही संभ्रमात असाल, किंवा काही काळासाठी अर्थसंकल्प पुढे ढकलला जाणार का? असा प्रश्न पडत असेल.

साधारणत: दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात. यंदाही तेच होणार आहे. भारत सरकारकडून दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 ला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. संसदेचे 2022 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे, जे 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र, यादरम्यान एक महिना सुट्टी असेल. सत्राचा पहिला भाग 31 जानेवारीला सुरू होईल आणि 11 फेब्रुवारीला संपेल. त्यानंतर महिनाभराच्या विश्रांतीनंतर सत्राचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होईल, जो 8 एप्रिलला संपेल.

विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग संसदेच्या कर्मचाऱ्यांनाही झपाट्याने आपल्या कवेत घेत आहे. 9 ते 12 जानेवारी दरम्यान संसदेच्या 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना अचानक झालेल्या चाचण्यांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 718 संसद कर्मचारी कोरोना संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. मंगळवारी लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन संकुलाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत.

आयकर अंतर्गत मानक कपातीची मर्यादा वाढवण्यासाठी कोविड-19 काळात दिलासा मिळण्यापासून ते केंद्रीय अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यापर्यंत, मध्यम वर्गाला अर्थमंत्र्यांकडून विशेष अपेक्षा आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी खास असणार आहे. कारण कोरोनाच्या संकटात देशाच्या आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. १ फेब्रुवारीला सादर होणारा सर्वसाधारण अर्थसंकल्प सरकारच्या तसेच उद्योग, सूक्ष्म व्यवसाय आणि देशातील करोडो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गेल्या २ वर्षात कोरोनाचे सावट असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. त्या दरम्यान देशाचे वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2020-21 मध्ये घसरले, ज्यामुळे FY21 GDP 7.3% कमी झाला. कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. FY22 साठी वाढ व्ही-आकाराची पुनर्प्राप्ती अपेक्षित आहे, दरम्यान, यंदाचे बजेट सादर करताना ओमिक्रॉन वेरिएंट प्रकरणांची वाढती संख्या एक अडथळा राहील.

गेल्या वर्षी, पारंपारिक ‘बही-खाता’ ऐवजी टॅब्लेट घेऊन सादरीकरणासाठी आलेल्या सीतारामन यांनी पहिल्यांदाच बजेट पेपरलेस स्वरूपात वितरित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *